Khasbaug Maidan - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content
4) Khasbaug Maidan and Palace Theatre

Chhatrapati Shahu Maharaj was a patron of art & sports. Like people here, he too was a lover of wrestling. After visiting the Olympic Stadium in Rome, he built a likewise wrestling arena in Kolhapur. This is a Khasbaug Maidan. Every wrestler in India dreams to fight a wrestling match in Khasbaug Maidan. One of it’s kind in India, this circular ground can occupy 30 to 40 thousand wrestling lovers, who can enjoy wrestling competition at a time. Many world famous wrestlers have competed in this red soil. The stadium is planned in such a way, any viewer can see tournament properly. Built during 1912 to 1918, this ground is like a deep plate, beside which there is an open theatre used to perform various cultural programs.
4) खासबाग मैदान व पॅलेस थिएटर

करवीर छत्रपती थोरले शाहुमहाराज हे कला व क्रिडा यांचे निस्सीम आश्रयदाते होते. इथल्या तमाम जनतेसारखे स्वत: महाराजदेखील कुस्तीचे चाहते होते. रोम येथील ऑलिंपिक मैदान पाहून दुरदृष्टीच्या या लोकराजाने कोल्हापुरात त्याच धर्तीवर कुस्त्यांचे मैदान बांधले. तेच हे खासबाग मैदान. खासबाग मैदानात, कोल्हापुरच्या मातीत कुस्ती खेळणं हे हिंदुस्थानातील प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं. देशातील एकमेवाद्वितीय अन् वैशिष्ट्यपूर्ण असे हे कुस्त्यांचे मैदान गोलाकृती असून इथल्या हिरवळीवर बसून एकाच वेळी 30 ते 40 हजार कुस्तीशौकीन  लढतीचा आनंद लुटू शकतात. खासबाग मैदानाच्या लाल मातीमध्ये अनेक जगप्रसिद्ध मल्लांनी स्पर्धा गाजवल्या आहेत. कुठेही बसले तरी मैदानातील लढत व्यवस्थित दिसेल अशी इथली रचना आहे. सन 1912 ते 1918 या सहा वर्षांच्या कालावधीत बांधलेलं हे मैदान खोलगट तबकाप्रमाणे असून याच्या बाजूलाच एक भव्य खुला रंगमंच आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी याचा वापर केला जातो.
Coordinates
16°42'5"N   74°13'27"E
Google Map
Opening time10.00 am
Closing time05.30 pm
Governed by
Kolhapur Municipal Corporation
Contact number
0231 2644644
Website
Entry feesPlease visit above URL
Back to content