Videos - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content

Main menu:

शारदीय नवरात्रोत्सव श्री शके 1940 शुभारंभ आजची तिथि प्रतिपदा युक्त द्वितीया
आजच्या तिथीला देवी नवरात्राला बसली हे दाखवण्यासाठी सर्वसाधारणपणे बैठी पूजा बांधण्याचा प्रघात आहे त्याला अनुसरूनच कोल्लूर मुकांबिका या स्वरूपाचे दर्शन घडवणारी करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची पूजा आज बांधण्यात आली आहे.

कोल्लूर हे दक्षिण कर्नाटकातील एक महत्वाचे मंदिर आहे भगवान परशुराम स्थापित या मंदिरात श्री जगदंबा त्रिगुणात्मिका आदिशक्ती रूपातच विराजमान आहे कोल नावाच्या महर्षींच्या प्रार्थनेवरून मुकासुराचा वधासाठी जगदंबा प्रगटली म्हणून तिला मूकांबिका असे नाव मिळाले रेणुका महात्म्या नुसार समुद्रमंथनातून प्रकटलेली लक्ष्मी कोणाचीही काहीही न बोलता मौन धारण करून करून या ठिकाणी विराजमान झाली म्हणून तिला मूकांबिका असे नाव मिळाले या ठिकाणी भगवान विष्णू सिंह रूपात तर भगवान शंकर वीरभद्र रूपात विराजमान आहेत रेणुकेचा पिता रेणू राजा अर्थात प्रसेंनजित यांनी मुक्तांबिकेची उपासना करूनच रेणुकेच्या जन्माचे वरदान मिळवले होते फाल्गुन शुक्ल पंचमीला मूळ नक्षत्रावर या देवीचा उत्सव असतो या ठिकाणी गाभाऱ्यात स्वयंभू लिंग रूपात देवी त्रिगुणात्मिका आदिशक्ती विराजमान आहे तर पाठीमागे असणारी अभय वरद शंख चक्र हे चारी हातात धारण करून पद्मासनात बसलेली आहे अशीही कोल्लूर मुकांबिका स्वरूपिणी श्री महालक्ष्मी आपणा सर्वांवर कृपा करो
श्री मातृचरणारविंदस्य दास: प्रसन्न सशक्तिक:
Back to content | Back to main menu