karveermahatmya - Ambabai Mahalaxmi Kolhapur

Go to content

॥ श्री करवीरमहात्म्य अध्याय पहिला ॥
( वाचन कालावधी १५ मिनिटे )

अथ श्रीकरवीरमहात्म्यप्रारंभः ॥ श्रीगणेशाय नमः । श्रीमहालक्ष्मै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ विष्णवादि देव जया नमिती ॥ जो नाशी विघ्नपंक्ती ॥ भक्तांसि देतो भुक्ति मुक्ति ॥ त्या गणेशा नमितो मी ॥ १॥ प्रल्हादास्तव स्तंभातून ॥ घे हिरण्यकशिपूचा प्राण । त्या नृसिंहा नमन माझें ॥ २  ॥  जी स्वनिवासें शोभवी कोलापुर ॥ जिनें वधिला कोलासुर ॥ रक्षिले देव मुनिवर ॥ त्या महालक्ष्मीस नमितो ॥३ ॥ ब्रह्मा निघे ज्याच्या नाभीतुन ॥ त्यास देयी वेदार्थज्ञान करी सर्वदेव जगाचे रक्षण ॥ त्या विष्णूस वंदितो ॥ ४ ॥ जो गणेशतात उमापती ॥ विष पिवून रक्षी सर्वांप्रति ।। प्रलयी करी सर्वांची हंती ॥ त्या शिवासि नमन असो ॥ ५ ॥ आणि ज्या सूर्यादि देवांच्या मूर्ती पार्वत्यादि सकळ शक्ती ॥ त्यासि नमितो व्हावया शक्ती ।। मज कवित्वादिकी पै ॥६ ॥ संस्कृतग्रंथाचे वक्ते ॥ तैसेच प्राकृतग्रंथ बोलते ॥ जे झाले कवित्वकर्ते त्या सर्वांस नमितो मी ॥ ७ ॥ ज्याच्या मुखातून निघाले वेद चार जो चतुर्मुख बसे हंसावर जेणें केलें विश्व चराचर ॥ त्या ब्रह्मदेवा नमितो मी ॥ ८ ॥ जे वेदांगकर्ते मुनी ॥ मीमांसाकर्ता जैमिनी योगशास्त्रकर्ता जो फणी ॥ तयाते मी नमितसे ॥ ९ ॥ नीतिशास्त्रकर्ते गुरूकाव्य । गजादिशास्त्रकर्ता पालकाप्य॥ जो वाल्मिकी करी रामायण आदिकाव्य ॥ या सर्वांसि नमन माझें ॥ १० ॥ जेणें जाणोनि वेदार्थास ॥ केली पुराणें अष्टादश ॥ करी ब्रह्मसूत्र आणि भारतास तया व्यासास नमितो मी ॥ ११ ॥ जे पराशरादीक मुनी मनुप्रभृती राजेही गुणी । जगा तारिती स्मृती करोनी ।। युगत्रयी त्यां नमितो ॥ १२ ॥ न्यायशास्त्रकर्ता गौतम विख्यात अलंकारशास्त्र की भरत ॥ धर्मशास्त्रकर्ते जे मुनींचे व्रत ॥ त्यांस त्यांस नमितो मी ॥ १३ ॥ जयाचे कवित्व तारी सकळां ॥ त्या ज्ञानेशादि कविकुळा ॥ नमितो मी देवोत मजला ग्रंथ कराया शक्तीते ॥१४ ॥ करवीरमाहात्म्य असे संस्कृत ॥ त्याच्या आधारे मी प्राकृत ॥ तेच करीन परी समर्थ ।। लक्ष्मीकृपा जाहलिया ॥ १५ ॥ मुक्याच्या मुखें ग्रंथ वदवी ॥ पंगूते गिरीउल्लंघन करवी ॥ ऐसी कृपा जियेची बरवी ।। तीते पुनः नमितसे ॥ १६ जो नारायण नरोत्तम ॥ सरस्वती आणि व्यास सत्तम ।। त्यांते नमोनी व्हावया सफल जन्म ॥ ग्रंथारंभ करावा ॥ १७ ॥ जी सर्व पापें नाशी ॥ देती सकळ मंगळासी ॥ जी बोलविती जनासी ॥ त्या शारदेसि नमितो मी ॥ १८ ॥ देवदैत्यमुकुटांच्या ज्योती ॥ जयाते नीरांजन करिती ॥ त्या देवी तुझे चरणाप्रति ॥ मंगल व्हावया नमितसे ॥ १९ ॥ जेणे चंचल ही इन्दिरा ॥ आपणामध्ये केली स्थिरा ॥ करी प्राण्याच्या उद्धारा ॥ विष्णुभक्तांनी पूर्ण जे ॥ २० ॥ जे दिसे भूमीवरी ॥ परंतु नव्हे जे धरित्री ॥ जे खालते वसे परी । स्वर्गाहून उंच असे ॥ २१ ॥ जे नाशी पापांचा निकर । दक्षिण काशी करवीर ॥ ते अनर्थाते सत्वर निरसून रक्षो जगातें २२ जी भवरोगाची नाशक मंगलाची वृद्धिकारक पवित्र आणि पापनाशक करवीर ही कामधेनू ॥ २३ तिचे जे कथारूपदुग्ध अति गोड सुखप्रद । जे उदार आणि नाशी मद ॥ त्याते सेवा सर्व हो ॥ २४ ॥ जो वेदशास्त्रपारंगत ॥ चाबर सुरमुनीनी पूजित | कृष्णवर्ण पिंगटजटायुक्त त्या व्यासास नमन असो २५ जो करी पुराणें अष्टादश तो सत्यवतीपुत्र व्यास ॥ पुढे येणारे कलियुगास आणि मूर्खजन पाहोनि ॥ २६ ॥ जो एक वेदाचा राशी ॥ त्याच्या करोनि चार भागासी ॥ पढवी चौघां शिष्यांसी ॥ उत्तमबुद्धी तयाते २७ त्याहून जे मंदमती जन ॥ त्याते त्या चार भागांतुन । शेवटोल शाखा काढुन एक एक चौघां पढवी ॥ २८ ॥ इतिहास पुराणें नामकास ॥ करोनि पांचव्या वेदास ॥ शांत दांत जो सूत तयास पढवी व्यास परियसा ॥ २९ ॥ जे नाना देव विद्याधरयुक्त ॥ नाना द्रुम तीर्थवेष्टित यक्ष किन्नर गंधर्व सहित विष्णुचक्रेशी चिन्हित जे ॥ ३० ॥ त्या नैमिषारण्यांत ॥ असती मुनी ध्यानस्थ ॥ अग्निहोत्री किती ज्ञानवंत एकाहुनि श्रेष्ठ एक पै ॥ ३१ ॥ कश्यप गालव गौतम ॥ गार्ग्य अंगिरा भृगु उत्तम ॥ वसिष्ठ याज्ञवल्क्य सत्तम ।। कुत्स कपिल भरद्वाज ॥ ३२ ॥ अत्रि विभावसु जातुकर्ण्य ॥ मांडव्य दुर्वास धनंजय ॥ जमदग्नि आपस्तंभ मार्कंडेय जाबाली आणि मुद्गलही ॥ ३३ ॥ कपिल आणि अघमर्षण ।। वामदेव आणि च्यवन ॥ जलंध आणि ज्ञान विधान ॥ गृत्समद प्रगाथही ॥ ३४ ॥ पावमान्य वीतिहोत्र ॥ पराशर विश्वामित्र ॥ शंख सौभरी पवित्र ॥ शौनकादी बैसले ॥ ३५ ॥ ऐसे अठ्याएंसी सहस्त्रमुनी ॥ भक्षिती वायु शुष्कपर्णा लागुनि ॥ जे मोठे आत्मसंयमनि ॥ मूतासि वोलती ॥ ३६ ऋषी ह्मणती अगा मता ॥ गोड सर्व शास्त्रांच्या कथा ॥ तूं सांगसी करोनी अर्था यास्तव आयुष्यमान हो ॥३७ ॥ जी भुवनत्रयांतील तीर्थे ॥ नाना स्थानी प्रख्यात ॥ ऐकोनि त्यांच्या माहात्म्याते ॥ बहु संशय होतसे ॥३ यास्तव करी संशयहानी ॥ जें क्षेत्रयुक्त तीर्थ श्रेष्ठानी ।। समर्थ इह पर फलंदानीं ॥ ऐसें तीर्थ वदावें ॥ ३९ ॥ जी तीर्थे पुष्करादिक महानद्या गंगाप्रभृतिक प्रयाग गया पांडुरंगक नैमिषारण्य विरजही ॥ ४० सेतुबंध द्वारका गोकुळ ॥ कृष्णा वेणी गौतमी श्रीशैल । काशी क्षेत्रही प्रबल ॥ चंद्रभागा सरस्वती ॥ ४१ ॥ इत्यादि सार्थे जेथें असती ॥ जेथे राहिल्या आम्हाप्रति ॥ सदा होय सुखाची प्राप्ती ॥ आणि नाशी संशया जे ॥ ४२ जें दे सर्व तीर्थांचे फळ ऐसे एकचि क्षेत्र निर्मळ ॥ सांग करोनि मन निश्चळ । ऐकोनि सूत बोलतसे ॥ ४३ ॥ मुनी हो माझें दैव अतुळ ॥ जास्तव सर्वत्र तुम्ही सकळ ॥ मला विचारिता म्हणोनि कुळ ॥ आणि कर्म पवित्र माझें ॥ ४४ जे अधीक काशीहून ॥ क्षेत्र करवीराभिधान । तयाचे मी करितो कथन ॥ श्री व्यासाते नमोनी ॥ ४५ ॥ जी जी तीर्थे त्रैलोक्यांत ॥ ती ती असती जयांत ॥ जें ब्रह्मेंद्रमुनीनी सेवित ॥ जें क्षेत्रांत वंद्यही ॥ ४६ ॥ जेथें देवीरूपधर ॥ विष्णूच राहे देववर ते श्रीक्षेत्र करवीर अनर्थातें निवारो ॥ ४७ ॥ जी ज्ञानामृतयुक्त पानपात्र ॥ वामहस्तीं घेवोनि पवित्र ॥ मातुलिंग रोगहर विचित्र ॥ सव्य करी घेवुनी ॥४८ महालक्ष्मी जेथें राहुन । वाटे भक्तांसि बोले वचन ॥ कीं बाळ हो भवतापे करून ॥ तुह्मी तापला यास्तव ॥ ४९ ॥ या पानपात्रांतील सेवा रस ॥ तो तुह्मां कडू लागल्यास हे गोड मातुलिंग खावयास तुह्मांलागी देयीन ॥ ५० ॥ खेटक गदा आयुधे दोन ॥ जी घे स्वहस्तेकरून ॥ जीचे घेतां दर्शन ॥ सर्व पापें नासती ॥ ५१ ॥ ऐसी लक्ष्मी जेथें वसे ॥ तेथे आधि व्याधि पीडा नसे ॥ ज्याते महामातृक ऐसे दुसरे नाम असे पै ॥५२ ॥ जी भागीरथी समान ॥ जना करी मुक्तीचे दान ॥ जीते आणिती पांचजण ॥ कश्यपादि मुनिश्रेष्ठ ॥ ५३ ॥ जी पंचमहापातकासी ॥ तमाते रवीसा स्नाने नाशी ॥ धरी पंचगंगा या नावासी ॥ ऐसी नदी जेथे असे ॥ ५४ ॥ जे आहे अष्टोत्तरशतकल्प ॥ यांत नसे काही विकल्प ॥ लिंगेंही असती अमूप ॥ परी त्यांत मुख्य ॥ अष्टोत्तरशेहे ॥ ५५ जें सर्वदा सुखकर ॥ आदिशक्तीचे असे घर ॥ जया ह्मणती कोल्हापुर ॥ तें करवीर सेवावे ॥ ५६॥ जी सर्व वांछा पुरवी ॥ जनांस मुक्तीस पाववी ॥ ती करवीर पुरी न सोडावी क्षणमात्रही जनांनी ॥ ५७ ॥ जीमध्ये पिंड दिल्यावाचुन ॥ पुत्रास न ये पुत्रपण ।। जीमध्ये असे रुद्राचरण ॥ ती रुद्रगया जेथे असे ॥ ५८ ॥ यवाधीक दक्षिण काशी ॥ ऐसें म्हणती जयासी जें मुकुट जंबुद्वीपासी ॥ तें करवीर सेवा हो ॥ ५९ ॥ जयाते मुनी सेविती ॥ जी अति उज्वळ दिसती ॥ ती अष्टलिंगें ज्या भोवती ॥ रक्षाया वसती अष्टदिशे ॥ ६० ॥ जे आपणांत राहे त्यास ॥ देते बहु आनंदास ॥ तसेच जो मरेल त्यास ॥ मुक्तीतेही देतसे ॥ ६१ ॥ हाती चक्र घेवोनि हरी ॥ निद्रा करोनि शेषावरी ॥ जै रक्षाया चहुद्वारीं ॥ जळामध्ये राहतसे ॥ ६२ ॥ रुद्र इन्द्र चंद्रादि देव ॥ जेथे राहती धरोनि भाव ॥ जेथे सर्व तीर्थांचा ठाव ॥ जें सर्वाधिक ही ॥ ६३ ॥ जी ब्रह्मादिदेवसेवित ॥ जीवंती नदीमिश्रित ॥ जयंती नदी विख्यात जया करवीरामाजी असे ॥ ६४ ॥ जें त्रैलोक्यांत शोभे बहुत ॥ राहती जे अशा क्षेत्रांत ॥ तयांच्या पुण्यासि नसे अंत ॥ रामेश्वरही जेथे असे ॥ ६५ ॥ जें सर्वतीर्थांनी युक्त सुंदर ॥ प्राचीन प्रख्यात पापनाशकर ॥ जेथे मल्लिकार्जुन शोभे पर्वतावर ॥ ऐसे क्षेत्र कोणते असे ॥६६ ॥ ज्याच्या चारी दिशेस बाहेर ॥ एक एक जलशायी श्रीधर एक एकही कल्लेश्वर ॥ ऐसे आठ असती ॥६७ ॥ दिव्य लिंगें विश्वेशादिक ॥ श्रीचक्रेशपुरीही चोख त्याची शोभा अलौकिक एक मुखे मी किती वर्णू ॥६८ ॥ जो मुनींद्रसेविततट । तो प्रयाग जयाच्या निकट वायव्येस असे प्रगट रूद्रपदही जेथे शोभे ॥ ६९हटकेश्वर बसे ज्यांत ऐशा विशाळ तीर्थाने युक्त । जेथे वसे विष्णुगया विख्यात ॥ ज्यासम तीर्थ नसे पै ॥ ७० ॥ करवीरच्या पश्चिमेपासुन तीन योजनी बदरिकावन जें करी पापाचे नाशन सिंह जेवी गजाचें ७१ मुद्गल मुनीश्वरयुक्त जेथे आहे विरजतीर्थ जें देते सर्व वांछित तें करवीर सेवा हो ॥ ७२ ॥  जें गोपगोपींनी संकुळ जें देते सर्व मंगळ ऐसे जेथे असे गोकुळ ते पुण्यवंती न सोडावें ७३ जयापाशी गोदानदीचा वास तो ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश आहे जयाच्या उत्तरेस तें करवीर सेवा हो ॥ ७४ ।। जो मातापित्याचा सेवक जयाचे नाम पुंडरीक त्याचे द्वारी जो विठ्ठल नामकः कटिं कर ठेवोनि उभा असे ॥ ७५ तो जेथें बत्तीस युग राहतो श्रीपांडुरंग ॥ ते नंदवाळपुर चांग ज्याचे नैऋत्येस असे ॥ ७६ ॥ जो श्रीने दुष्टांच्या दमनी योजिला साधूच्या रक्षणीं | तो रंकभैरव दुष्टां मारोनी जेथे साधूंचे रक्षण करी ॥ ७७ ॥ आपणांत जे राहती नर ॥ त्यांते अभयद जें पवित्र तें पापनाशक करवीर । सर्वदाही सेवा हो ७८ उज्वलांबा सुंदरी वसे ज्याच्या पूर्व दारी कात्यायनी नामक देवी बरी दक्षिण द्वारी वसतसे ७९ सिद्ध आणि बटुकेश असती ज्याच्या पश्चिम द्वारास रत्नेश्वराचाही वास उत्तर द्वारी जयाच्या ॥ ८ ॥ क्षेत्राच्या पूर्व दिशेस । एक कोशावरी सुरस त्र्यंबुली वसे रक्षणास ऐसा क्षेत्रमहिमा असे ॥ ८१ जेथें राहता दीड मास पवित्र करी सप्तकुळांस ॥ महाकल्पकृत पापास नाशितसे सर्वथा ॥ ८२ तेथे स्नानदानादिके पाप नासे यांत आश्चर्य काय असे ॥ वीर महार्गल जेथे बसे । दैत्यदर्पनाशक ॥ ८३ वीर महार्गल रंकभैरव ॥ सदा नाशिती दैत्य दानव ॥ जेथे श्रीने हे दोघे देव ॥ हस्ती दंड देवोनि ठेविले ॥ ८ श्रीच्या वराते पावोनि देव स्वपूजनें देती काम सर्व ऐसे जेथे राहती भैरव तो क्षेत्रमहिमा कोण वर्णी ८५ ॥ जे तीर्थवरांनी संयुक्त सर्व देवांनी सेवित जें देते सर्व बांछित ॥ ऐसें क्षेत्र दुजे नसे ॥ ८६ ॥ पद्मपुराण हेंचि ब्रह्मांडथोर त्यांत करवीरखंड पृथ्वीरुचिर ॥ माजी करवीरमाहात्म्य रत्नाकर ॥ त्यांतील रत्न प्रथमोध्याय गोड हा  ॥ ८७

इति श्रीपद्मपुराणे करवीर खंडे करवीरमाहात्म्ये नारद मार्कडेय संवादे प्रथमोध्यायः ॥ १ ॥

इति प्रथमोध्यायः समाप्तः
Back to content